0%
Caution: JavaScript execution is disabled in your browser or for this website. You may not be able to answer all questions in this survey. Please, verify your browser parameters.

Life with Corona

कोरोना विषाणू (एसएआरएस-कोव्ह -२) आणि कोविड -१९ हा आजार जगभर पसरत आहेत.

लाईफ विथ कोरोना म्हणजे कोरोना सोबत आयुष्य या विषयावरील अभ्यासात आपला सहभाग, कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या महामारीच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांचा अभ्यास करण्यात संशोधकांना महत्वाची माहिती पुरवेल.

लाईफ विथ कोरोना म्हणजे कोरोना सोबत आयुष्यहाआय एस डी सी,आय डी एस,आय जी झी,कॉन्स्टान्झ युनिव्हर्सिटी, आणियुनू-वाईडर मधील शास्त्रंज्ञांच्या गटाने सुरु केलेला एक नागरिक विज्ञान प्रकल्प आहे , आणि हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांबरोबर सहयोग करतो. हा अभ्यास २३ मार्च २०२० रोजी सुरू झाला आणि किमान २०२১ संपेपर्यंत चालू राहील. एक आंतराष्ट्रीय संशोधकांचा आणि स्वयंसेवकांचा गट हा प्रकल्प चालवतो व त्यांचे नेतृत्व प्रोफेसर टिलमन ब्रुक करतात. युनू-वाईडर द्वारे या अभ्यासाला नैतिक मान्यता मिळाली आहे आणि त्याचा संदर्भ क्रमांक “UNU Ref No: 202009/01” असा आहे.

आपल्याकडे काही प्रश्न असल्यास, कृपया या पत्त्यावर ईमेल पाठवा lifewithcorona@isdc.org

सर्वेक्षण पूर्ण व्हायला अंदाजे १०-१५ मिनिटं लागतील.


 
संमती फॉर्म आणि माहीती संरक्षणासंबंधित माहीती

ऐच्छिक सहभाग आणि निनावीपणा

या अभ्यासातील आपला सहभाग ऐच्छिक आहे. सहभागी होण्यासाठी आपले वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. आपण या अभ्यासामधील आपला सहभाग कधीही रद्द करू शकता. आपला सहभाग संपविण्याचा निर्णय कोणत्याही प्रकारे आपल्या विरोधात धरला जाणार नाही. ही संग्रहित केलेली माहीती निनावी आहे आणि यात वैयक्तिक तपशिलांचा समावेश नाही (आपल्या इच्छेनुसार आपण आम्हाला दिलेला ई-मेल आयडी वगळता).

काही काळानंतर या अभ्यासात पुन्हा भाग घेण्यासाठी, आम्ही सर्वेक्षणाच्या शेवटी आप्ल्यायला ईमेल आयडी विचारू. आम्हाला आपला ईमेल आयडी देणे ऐच्छिक आहे. आपण आपला ईमेल आयडी देऊ इच्छित नसल्यास, आपला निर्णय कोणत्याही प्रकारे आपल्या विरूद्ध धरला जाणार नाही. आपला ईमेल पत्ता सर्वेक्षण माहितीपासून वेगळा स्वतंत्रपणे संग्रहित केला जाईल आणि अभ्यास संपल्यानंतर तो नाहीसा केला जाईल.

माहिती संरक्षण

आयएसडीसी जीजीएमबीएच, ऑगस्टस्ट्र. ८९, १०११७ बर्लिन, lebenmitcorona@isdc.org माहीती संरक्षणासाठी जबाबदार आहे. आयएसडीसी युरोपियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (डीएसजीव्हीओ) मध्ये विहित डेटा संरक्षण नियमांचे पालन करते. आमच्यासाठी जबाबदार माहीती संरक्षण अधिकारी जीएफएडी डेटनसचुट्झ जीएमबीएच, datenschutz@gfad.de आहे.

माहीती संग्रहाचा उद्देश

आयएसडीसी आणि त्यांच्या शैक्षणिक भागीदारांकडून माहीतीचे सांख्यिकीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या मूल्यांकन केले जाईल. त्यातून उत्पन्न झालेली निनावी माहीती सांख्यिकीय आणि वैज्ञानिक विश्लेषण तयार करण्यासाठी वापरली जाईल. ही विश्लेषणे आणि ज्यावर ती आधारित आहेत ती संशोधनाची माहीती दानाच्या हेतूसाठी निनावी स्वरूपात सार्वजनिक केली जातील. आपला ईमेल पत्ता कधीही सार्वजनिक केला जाणार नाही.

संमती पत्र

कलम. ६ परिच्छेद १, एस १ लिट. ए डीएसजीव्हीओ प्रमाणे, आपली वैयक्तिक माहीती (अर्थात ईमेल पत्ता) हाताळण्यासाठी कायदेशीर आधार, आपली ऐच्छिक संमती हा आहे. आपण ही संमती कधीही मागे घेऊ शकता. त्यासाठी संपर्क करा lifewithcorona@isdc.org वर .

आपल्या माहीतीशी संबंधित आपल्याला पुढील अधिकार आहेतः माघार घेण्याचा अधिकार, माहितीचा अधिकार, चुका दुरुस्तीचा अधिकार, रद्द करण्याचा अधिकार, प्रक्रियेवर निर्बंध घालण्याचा हक्क, माहीती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यावर अधिकार, आक्षेप घेण्याचा अधिकार, पर्यवेक्षी प्राधिकरणाकडे अर्ज करण्याचा अधिकार. कृपया अधिक माहितीसाठी आमच्या माहीती संरक्षण धोरणाचा संदर्भ घ्या.

वेब विश्लेषण